गणराज्य न्यूज अहिल्यानगर
राहुरी फॅक्टरी
राहुरी येथील प्रसादनगर भागात नितीन पुंड यांच्या मालकीचे असलेले किराणा दुकान, प्रीती साळवे यांच्या मालकीचे असलेले ब्युटी पार्लर व त्याच बरोबर सारिका कांगळे यांचे कपड्याचे दुकान हे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या तीनही दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ही घटना शनिवार २४ मे रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. या आगीत तीनही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात नितीन पुंड यांचे किराणा दुकान असून प्रीती साळवे यांचे ब्युटी पार्लरचे दुकान व सारिका कांगळे यांचे कपड्याचे दुकान आहे दुपारच्या दरम्यान अचानक नितीन पुंड यांच्या किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने या आगीने मोठा पेट घेत शेजारीच असलेल्या ब्युटी पार्लर व कपड्याच्या दुकानालाही त्याआगीने विळखा घालत प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीने उग्र रुप धारण केले होते.
यानंतर देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत तीनही दुकानांचे मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग विझवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिका अग्निशामक विभाग व परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती.
















