राहुरी : 9 ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजी नगरमध्ये होत असलेल्या मोर्चासाठी ब्राम्हणी येथून प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी गेले आहेत.आज सकाळी ब्राम्हणी येथून तालुक्यातील सहकाऱ्यांच्या ताब्यात त्यांची गाडी रवाना झाली.
दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी मोलमजुरांच्या न्याय हक्कासाठी शुक्रवार 9 ऑगस्ट क्रांती दिनी छत्रपती संभाजी नगर मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य जनआक्रोश मोर्चा होत आहे.तरी नगर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथून दिव्यांग प्रहारचे माणिक तारडे, अध्यक्ष बाबुराव शिंदे सर, राहुरी तालुका सल्लागार राजू भाऊ चांदघोडे, सदस्य गोपीनाथ हापसे, दादा हापसे, संजय गोरे, नामदेव दळवी, तुकाराम तोडमल,जानू वने, मुकुंद लांडे आदींनी ब्राम्हणीतून आज सकाळी छत्रपती संभाजी नगरकडे प्रस्थान केले.
दिव्यांग प्रहारचे जिल्हा संघटक आप्पासाहेब ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे येथील प्रहार सैनिक छत्रपती संभाजी नगरकडे रवाना