Home राजकीय वारकरी व अध्यात्मिक कार्याचा गौरव

वारकरी व अध्यात्मिक कार्याचा गौरव

31
0

नगर जिल्ह्याचे अध्यात्मिक भूषण गुरुवर्य ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांना विश्वशांती विद्यापीठाचा “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” आज गुरुवार 03 ऑक्टोबर रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भागवत धर्म वाढविण्याचे एक महान असे मानव कल्याणाचे पुण्यात्मक धर्मकार्य केल्याबद्दल गुरुवर्य ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांना माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे व श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.आहे.

पुरस्कार निवड समितीच्या वतीने नुकतेच या आशयाचे पत्र गुरुवर्य बाबांना प्राप्त झाले होते.
या पत्रात निवड समितीने गुरुवर्य बाबांच्या वारकरी सांप्रदायातील कार्याबद्दल म्हंटले आहे की,वारकरी सांप्रदायाची वैभवशाली परंपरा आपण लहान वयापासून जोपासली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व भारतीय तत्वज्ञानाला अनुसरून आपण जीवनभर आपले कार्य अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने जोपासले आहे. आशा शब्दात गुरुवर्य बाबांच्या कार्याचा निवड समितीने गौरव केला आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास जगभरातील विविध धर्माचे प्रमुख,शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत उपस्थित राहणार होते.या पुरस्काराबद्दल गुरुवर्य बाबांचे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले.🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here