गणराज्य नगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे 26 जानेवारी पासून मुंबईत उपोषण सुरू होत आहे.शनिवारी 20 रोजी अंतरवाली सराटी येथून पायी यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी 8 वाजता पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पद यात्रा नगर जिल्ह्यात प्रवेश करत आहे.
मिडसांगवी गावात तब्बल चार टन पोह्यांच्या नाश्त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आज रात्री पाथर्डी नगर महामार्गावरील बाराबाभळी येथे दीडशे एकरावर जाहीर सभा व मुक्काम आहे.सुमारे 25 लाख मराठा बांधव या दरम्यान सहभागी राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून सदर परिसराची नुकतीच पाहणी करण्यात आली.
नगर जिल्ह्यातून (मिडसांगवी ते सुपा ) असा 135 किलोमीटरचा पद यात्रेचा प्रवास असणार आहे.