श्रीरामपूर : शहरातील कॉलेज रोडवरील संतलुक हॉस्पिटल परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
गोळीबारात जखमी बंटी जहागीरदार यांना तात्काळ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













