राहुरी फॅक्टरीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी
गणराज्य न्यूज राहुरी फॅक्टरी
संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज राहुरी फॅक्टरी येथील सकल नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज यांना अभिवादन करत पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.
गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे सौ.व श्री.रवींद्र औटी यांच्या हस्ते संत सेना महाराज यांचे पूजन करून अभिवादन करत महाप्रसादाचे आयोजन सकल नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले.
प्रसंगी नाभिक संघटनेचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष ऋषि राऊत,आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ,चांगदेव पवळे, सुनील विश्वासराव,उद्धव राऊत,विजय सोनवणे,कुशीनाथ राऊत,आप्पा थोरात, अनिल वाघमारे,महेश बिडवे, आदिनाथ गायकवाड,उद्योजक भुवन गुंड,दत्तात्रय राऊत,सचिन वाघमारे,प्रसाद वाघमारे,बबलू गायकवाड,महेश पवळे,संदीप साळुंके,तुषार राऊत,अभि राऊत,बाळासाहेब मदने,सोमनाथ मदने,मयूर राऊत,वैभव राऊत,प्रणव राऊत, आदिंसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.













