राहुरी : कृषि उत्पन्न बाजार समितीस यंदाचा महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या वतीने मानाचा स्व.वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती राहुरीस नाशिक विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल पुणे येथे झालेल्या संघाच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुर्वी सन 2018 मध्येही राहुरी बाजार समितीस या पुरस्काराने गौरवीण्यात आले होते. या वेळी बाजार समितीचे सर्व सन्माननीय संचालक वृंद उपस्थित होते.













