गणराज्य न्यूज राहुरी
डाळिंबावरील कीड व रोग व्यवस्थापन बाबत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून उद्या शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी राहुरी पंचायत समितीमधील डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात 11.30 वाजता प्लॉट धारक शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले आहे.
डाळिंबावरील कीड व रोग
नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोना याबाबत डाळिंब कीड रोग शास्त्रज्ञ डॉ. भरत दवंगे व प्रसिद्ध डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष पन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.













