ब्राम्हणी : भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमातीसाठी उद्या शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी ब्राम्हणी तलाठी कार्यालयाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी दिली.
सेतू चालकांनी आपणाकडे असलेले दाखले घेऊन उपस्थित रहावे कोणीही गैरहजर राहू नये राहिल्यास आपणाविरुद्ध अहवाल वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी सदर कॅम्पमध्ये जातीचे दाखले रहिवासी दाखले उत्पन्न दाखले रेशन कार्ड वरील नाव कमी व नाव समाविष्ट करणे इत्यादी कामे करणार असून आपल्या गावातील नागरिकांचे वरील प्रमाणे कागदपत्र घेऊन ब्राह्मणी येथे उपस्थित ठेवावे..असे आवाहन महसूल मंडळ अधिकारी विश्वास आढाव व कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी केले आहे.













