
ब्राम्हणी : गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने भूमिगत सांडपाण्याचा ड्रेनेज ओहरफ्लो झाल्याने गावातील प्रभाग क्रमांक तीन मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रस्त्यावर मैलमिश्रित पाणी साचल्यानं दुर्गधी पसरली असून स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे.
सकाळीच स्थानिक ग्रामस्थांनी गणराज्य न्यूजशी संपर्क साधत सदर गोष्टीकडे लक्ष वेधले.
गणराज्य न्यूज टीमने प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट घेतला.यावेळी स्थानिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आल.सदस्य गणेश तारडे यांनी पाहणी करत सदर प्रश्न सरपंच सुवर्णा बानकर यांना सांगितला.गणराज्य न्यूज टीमनेही प्राप्त परिस्थिती सांगितली.तात्काळ सदर ग्रामपंचायत कर्मचारी व जेसीबीच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल असे सरपंच बानकर यांच्याकडून सांगण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अंगणवाडी आहे. त्यासमोरच हे सर्व मैल मिश्रित पाणी साचलं.पावसाळ्यात नेहमीच अडचण येते.लहान लेकरांना अंगणवाडीत जाता येत नाही. यावर कायमस्वरूपी उपयोजना महत्वाच्या आहेत. अशी मागणी अंगणवाडी सेविका यांनी केली. या चौकातून राजदेव जामदार तारडे भिसे वस्तीकडे जावे लागते. रस्त्यावरून प्रवास करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे फक्त ग्रामपंचायतच नाही तर स्थानिक नागरिकांनी परिसर स्वच्छता ठेवून सहकार्य करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील उकिरडे,कचरा टाकू नये अशी मागणी सदर रस्त्यावरून पुढे प्रवास करणारे रहिवाशी करत आहेत.












