ब्राम्हणी – गावातील वन विभागाच्या जंगलाच्या बाजूला मोकळ्या जागेत गत 19 वर्षापासून श्रीराम गणेश मंडळ गणरायाची सेवा करतात.
जंगल मे मंगलमय कार्य श्रीराम मंडळाकडून सुरू आहे. दोन वर्षापासून गणेश उत्सव काळात मंडळाकडून गणेश वृक्ष लागवड अभियान सुरू आहे.
यंदाच्या वर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वन विभागाच्या ओसाड मोकळ्या जागेत मंडळाच्या सदस्यांकडून वृक्ष लागवड सुरू आहे. दरवर्षी 10 दिवस दररोज सायंकाळी अन्नदान असते. अन्नदात्यांच्या हस्ते झाडे लावले जातात. राजदेव, जामदार, इनामदार,तारडे, भिसे,ठुबे आदी परिवार या उपक्रमात सहभागी आहेत