राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावच भूषण डॉ.तनपुरे सहकारी कारखान्याचे माजी संचालक,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षाचे राहुरी तालुका कार्याध्यक्ष भारतभाऊ भैय्यासाहेब तारडे यांचे निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज बुधवार दुपारी 2 वाजता ब्राम्हणी देवीच्या तळ्यावर होणार आहे.
स्व.भैय्यासाहेब तारडे (वय ४७) यांचा राजकीय,सामाजिक वारसा भारत तारडे यशस्वीपणे पुढे नेला.सन 1978 मध्ये तारडे परिवाराच्या राजकारणाला सुरुवात झाली.स्व.भैय्यासाहेब तारडे यांनी गाव पातळीवर एका गटाचे नेतृत्व केलं. ग्रामपंचायत सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत वैचारिक सहकार्यांना सोबत घेऊन विरोधकांना कायम आव्हान दिले.लोकनेते स्व.खासदार बाळासाहेब विखे पाटील,लोकनेते स्व. रामदास नाना धुमाळ यांच्या समवेत राजकीय जीवनात काम केले.
1984 ते 2016 दरम्यान तारडे परिवारातील 3 सदस्य संचालक पदावर कार्यरत राहिले.अनेक वर्ष राजकीय संघर्ष केला. तालुक्यातील हितचिंतक, नातेवाईकांच्या सहकार्याने राजकारण यशस्वी झाल. स्व.भैय्यासाहेब तारडे यांचे विचार व काम भारत भाऊ तारडे यांच्या रूपाने पुढे जात असताना दुर्दैवाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
शांत,संयमी नेतृत्व म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहत.
आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी नुकतीच त्यांच्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या राहुरी तालुका कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती.विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व अन् पदाला न्याय देण्यासाठी तळागाळात काम केलं
तारडे परिवार कायम सर्वसामान्यांसाठी काम करत आला.
सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावीत असा प्रामाणिक उद्देश कायम राहिला.. तारडे परिवाराच रत्न व ब्राम्हणी परिसराच नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारत तारडे यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा मुलगी, चुलते,भाऊ शरद असा परिवार आहे. भारत तारडे यांचा परिवार खूप मोठा आहे.