Home महाराष्ट्र बाप्पाच्या दारी महिलांचा सन्मान भारी

बाप्पाच्या दारी महिलांचा सन्मान भारी

9
0

 

चेडगाव | प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे शिवस्वराज्य युवा मंचच्या वतीने आयोजित ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठीचा मनोरंजनात्मक व उत्साहपूर्ण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, विविध खेळ, प्रश्नमंजुषा, उखाणे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्रसिद्ध निवेदक गणेश हापसे यांनी आपल्या दमदार आणि उत्स्फूर्त निवेदनातून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे उपस्थित महिलांचा उत्साह वाढला.

विविध मनोरंजनात्मक खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध बक्षिसे पटकावली. या उपक्रमामुळे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, मनोरंजनासोबतच महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढविण्याचा सुंदर उपक्रम यशस्वी झाला.

या कार्यक्रमात ललिता संदीप तरवडे, वर्षा योगेश तरवडे आणि मनीषा देविदास शिंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तसेच सुमारे ७० हून अधिक महिलांनी विविध खेळ, प्रश्नमंजुषा आणि लकी ड्रॉमध्ये सहभाग घेत असंख्य आकर्षक बक्षिसे जिंकली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजय तरवडे, कैलास रभाजी तरवडे, अशोक राधाजी तरवडे, भारत संतराम तरवडे, रमेश सुखदेव तरवडे, महेश सुदाम तरवडे, बाबासाहेब भाऊसाहेब तरवडे, प्रवीण बाळकृष्ण तरवडे, किशोर सदाशिव तरवडे, विलास बापूसाहेब तरवडे आणि अरुण दत्तात्रय तरवडे आदींनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवस्वराज्य युवा मंच, सतीमाता तरुण मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, शिव शंकर मित्र मंडळ आणि दोस्ती ग्रुप बैलगाडा संघटना यांचेही विशेष सहकार्य लाभले. उत्कृष्ट नियोजन, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे चेडगावमध्ये रंगलेला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here