बाप्पा तुमचं आगमन 27 ऑगस्टला मोठ्या उत्साहात झालं.अन् नेमकी पुढील तीन दिवसात म्हणजे 30 ऑगस्टला ब्राम्हणी गावची ग्रामसभा पार पडली.अनेक वर्षापासून ग्रामस्थांना होणारा dj च्या त्रासाचा अन् आवाजाचा मुद्दा उपस्थित झाला.ग्रामस्थांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात काहींनी dj विरोधात जाहीर मत व्यक्त केलं. ज्यांना माईकवर पुढे जावून बोलता येत नाही.त्यांनीही dj च्या अति आवाजा विरोधात कायमस्वरूपी काही तरी करायलाच पाहिजे अशी मागणी केली.त्यानुसार ठराव घेण्यात आला.यापुढे गावात विनापरवानगी dj वाजविल्यास कारवाई केली जाईल.अस सांगण्यात आलं.
त्याच ग्रामसभेला आठ दिवस पूर्ण होत नाही तोच..बाप्पा तुमच्या विसर्जन मिरवणुकीला एक नव्हे एकाच वेळ एकापाठोपाठ 5..5 dj दिसून आले.मग एवढ्यांना ग्रामपंचायतकडून परवानगी मिळाली का? एक डिजे चालू असल्यावर कानात बोट घालून लांब अंतरावर जावं वाटत.त्यावेळी कान बधीर होतात.बाप्पा मिरवणूक मार्गावर 5 डीजे च्या कर्णकश आवाजात आपण किती वेळ होता.मग आपले कान किती दुखले असतील ना.त्याबद्दल क्षमस्व…! माफी असावी..
बाप्पा तुमचं आगमन होताच तीन दिवसात ग्रामभेत चर्चा झाली.त्यानुसार अनेकांना अपेक्षा होती. यंदाच्या वर्षी सर्वाचे लाडके बाप्पा पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून निरोप घेतील.अन् एक आदर्शवत डीजे मुक्त गाव म्हणून ब्राम्हणी गावचे नाव अहिल्यानगर जिल्ह्यात पुढे येईल.अस वाटल.पण तसं न होता कधी नव्हे ते इतके dj एकाच वेळी शुक्रवारी रात्री ब्राम्हणी गावात वाजले.ते पण कमी नाही जास्त डिसिबल आवाजात..
मग ग्रामपंचायतने ग्रामसभेतील त्या ठरावाचे फक्त कागदी घोडेच नाचविले का? की डिजे बंदीच्या ठरावाचा फक्त फार्स केला.याचा अर्थ त्यावर कार्यवाही झालीच नाही. ग्रामपंचायतने वरती पत्र पाठविले असेल तर मग प्रशासनाने गांभीर्याने का घेतले नसेल.याचा अर्थ कार्यवाही नाही.
राहुरी पोलिस प्रशासनाने तीन दिवसापूर्वी टाळ मृदंगाच्या गजरात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पोलीस कॉलनीतील बाप्पाचा विसर्जन केलं.त्याच सर्वत्र कौतुक झालं.हाच आदर्श तालुक्यातील अन्य मंडळांना घालून देण्यात पोलीस प्रशासन कमी पडल का? मिरवणुकी दरम्यान वांबोरी बीटचे पोलिस ब्राम्हणीत बंदोबस्तासाठी नव्हते का?असल्यास त्यांना 5 ..5 डीजेचा दणदणाट असा मोठा आवाज ऐकू आला नाही का?कारवाई का केली नाही. असे एक ना अनेक प्रश्न dj बाबतीत उपस्थित होत आहे.
विविध मिरवणुका,लग्न,सण,उत्सवा दरम्यान dj वाजविण्यास पूर्वीपासून मुळीच विरोध नाही.पण आवाजाची एक मर्यादा असावी.शेवटी लहान मुले,जेष्ठ व्यक्ती याशिवाय अनेकांना होणारा त्रास समजून घेतला पाहिजे.एका वेळी एका ठिकाणी एवढ्या मोठ्या आवाजाची dj वाजल्यास तेथील परिस्थिती काय असेल!याचा विचार न केलेलाच बरा….बाप्पा आता तुम्ही जाता जाता dj मुक्तीसाठी त्यांना सुबुद्धी द्यावी.अशी मागणी ग्रामस्थ करत आहे…













