
ब्राम्हणी : गावातील नाथभक्त परिवाराकडून देवी मंदिर परिसरात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ तपोभूमीत विविध देव देवतांच्या मंत्र मंत्रोपचारात होम हवन करण्यात आला.
दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला नाद भक्तांनी एकत्रित येत औघडपीर सोहमनाथजी महाराज,नाथभक्त महेश (भाऊ) रासकर,नाथभक्त विजय माने यांच्या मार्शनाखाली बडे बाबांच्या मंदिरासमोर होम प्रारंभ केला.
आता दर गुरुवारी महा आरती तसेच प्रत्येक महिन्याला (अमावस्या पौर्णिमेला) होम कार्यक्रम होणार असल्याचे नाथ भक्तांनी सांगितले. नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता वाढविण्यासाठी तसेच यश व शांतीसाठी होम महत्वाचा आहे.
भविष्यात असा उपक्रम कायम राबविण्यात येणार आहे.
अल्पावधीत ब्राह्मणी परिसरातील नाथ भक्तांनी हिंदुत्वाचा कौतुकास्पद असा नवा आदर्श निर्माण निर्माण करत तरुण पिढी योग्य मार्गाला घेवून जाण्याचे काम केले आहे.
नाथ भक्तांकडून ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज यांची मोठी सेवा होत आहे.आज सायंकाळी बडे बाबांच्या मंदिर परिसरात दीपोत्सव कार्यक्रम होत आहे. तो यशस्वी करण्यासाठी नाथ भक्त प्रयत्नशील आहेत.












