Home महाराष्ट्र तर,विधानसभा निवडणुकीत उतरणार

तर,विधानसभा निवडणुकीत उतरणार

59
0

अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात सरकारच्या शिष्टमंडळास अखेर आज गुरुवारी यश आले आहे.दरम्यान उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

13 जुलै पर्यंत निर्णय घ्या. अन्यथा विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान सगे सोयरेंबाबत काय काम झालं? असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी शिष्टमंडळाला उपस्थित केला. आचारसंहितामुळे सर्व खात्याचे काम बंद होते.असे उत्तर शिष्टमंडळाने दिले.
आणखी दोन महिने वेळ वाढवून द्या, मित्र म्हणून मित्राच थोडं ऐका असे शिष्टमंडळातील सदस्य शंभूराजे देसाई म्हणाले..यावेळी छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यावेळी उपस्थित होते.

मराठा कुणबी एकच आहेत. अनेक नोंदी सापडल्यात आता अडचणी नाहीत. शिंदे समितीने काम सुरू ठेवाव. शिंदे समिती रद्द करू नका..अधिकारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत.राज्यभरातील केसेस मागे घ्या.असे पाटील म्हणाले.
सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का?असे मनोज जरांगे पाटील उपस्थित समाजाला विचारलं…सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. उद्याच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतो असे देसाई म्हणाले.जरांगे पाटील यांच्या लढयाने 10 टक्के आरक्षण मिळाले असल्याचे देसाई म्हणाले..

10 महिन्यापासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणासाठी सहकार्य केले.त्याबद्दल मराठा ओबीसी समाजाचे .जरांगे पाटील यांनी आभार मानले.आता यापुढे आपआपसात वाद नको. गुण्यागोविंदाने रहा असे म्हणत आभार सर्वाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here