Home महाराष्ट्र
89
0

गणराज्य न्यूज अहिल्यानगर : गत मे महिन्यात जोर धरलेला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा अन् फायद्याचा ठरला. कशा बशा पेरणी व लागवडी झाल्या.आता पिकांना पाऊसाची गरज असताना त्याने पाठ फिरवली आहे.

पेरणीनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मे महिन्यातच चांगला धिंगाणा घातला होता. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाने ओढे आणि नाले ओसंडून वाहू लागले होते. मे महिन्यात झालेल्या या अवकाळी पावसाने पेरणीपूर्व मशागतीला मोठी मदत झाली होती. परिणामी पिकांची उगवणही समाधानकारक झाली आहे. मात्र,एन पिके वाढीत असताना पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. कोवळी पिकं पाण्याअभावी सुकू लागली आहेत. आभाळात ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नाही. गेल्या आठवड्यापासून हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरिपाची उगवण झालेली कोवळी पिकं वाचण्यासाठी निदान रिमझिम पाऊस तरी होऊ दे, अशी बळीराजा विठ्ठलाकडे विनवणी करीत आभाळाकडे डोळे आहे. लावून बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here