Home महाराष्ट्र 81 लाख रुपयांचे कर्ज वाटप

81 लाख रुपयांचे कर्ज वाटप

33
0

गणराज्य न्यूज
उंबरे

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना खेळते भांडवल व कर्ज वाटपाचा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी उंबरे येथे पार पडला.

जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून लाभ धारक महिलांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या हस्ते ८१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.दरम्यान सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे,डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे,माजी संचालक रविंद्र म्हसे,प्रभाकर हरिचंद्रे, धनंजय आढाव,सुभाष गायकवाड, माजी उपसरपंच संतोष ढोकणे,भाऊसाहेब ढोकणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here