गणराज्य न्यूज ब्राम्हणी
स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींनी परिसरातील झाडांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोखा उपक्रम राबविला.
रक्षाबंधन सण फक्त भावाबहिणींच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता, नवनवीन झाडे लावून अन् त्यांना राखी बांधून निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेतली. या उपक्रमातून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरण जपण्याचा संदेश दिला. त्यांच्या या विधायक व आदर्शवत उपक्रमाचं वृक्षप्रेमी, ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक होत आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी
विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल ब्राह्मणी येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट केली.ओवाळणीचे ताट सजवले.अन् मुलांचे औक्षण करत त्यांना ओवाळले.
आनंददायी वातावरणामध्ये शाळेच्या प्राचार्य अश्विनी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थिनींनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना राखी बांधून आपले बंधू प्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी छोटीशी भेट वस्तू देऊन बहिणींना रक्षणाचे वचन दिले. सर्व जीव सृष्टी महत्वाच्या असणाऱ्या वृक्षांना राखी बांधून आपले वृक्ष प्रेम व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी.भारतीय संस्कृती,परंपरा यांची जपणूक बहिण भावाचे नाते दृढ करणारा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.दरम्यान प्राचार्य सौ.अश्विनी प्रकाश बानकर यांनी मार्गदर्शन केले.













