गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील सहकार,सांस्कृतिक,वारकरी परंपरा असलेल्या ऐतिहासिक श्री क्षेत्र ब्राम्हणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास उद्या गुरुवार स्वातंत्र्य दिनाच्या पर्वदिनी 50 वर्ष पूर्ण होत आहे.
त्यानिमित्ताने समस्त ग्रामस्थ व वारकरी परिवाराच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्या कामी आपला सहभाग, सहकार्य व उपस्थिती महत्वपूर्ण आहे..
संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई यांचा दिंडी सोहळा अनेक वर्षापासून ब्राम्हणीतून पंढरीची आषाढी वारी करतो. त्यानंतर पंधरा दिवसांनी धाकट्या एकादशीला भाविक-भक्त दर्शनासाठी येतात. विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या बालदिंडीचा रिंगण सोहळा पार पडतो. ब्राह्मणी हेच आपलं पंढरपूर समजून अनेक भाविक गावातीलच विठ्ठल रुक्मिणीची वर्षभर पूजा अर्चा नित्यनियमाने करतात.दरवर्षी दीपावली सणाला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दीप उत्सव साजरा केला जातो.अस 50 वर्षाच गावाचं वैभव असणार ब्रह्मांडनायक जगाचा निर्माता पांडुरंग यांच्या मंदिराचा सुवर्ण महोत्सव….. साजरा करण्याचे भाग्य ब्राह्मणीकरांना लाभतंय….ही भाग्याची गोष्ट…… तरुण वारकऱ्यांनी सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेच ग्रामस्थांकडून स्वागत केलं जातं आहे. भविष्यात पुढची पिढी अमृत महोत्सव साजरा करेल हे निश्चित……….