राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी गावातील तलाठी कार्यालय कधी नव्हे ते सध्या सुदंर व आकर्षक दिसून येत आहे.
15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तिरंगी फुगे व सजावटीची आणखी भर पडली .ब्राम्हणी महसूल परिसर मोठा आहे.त्यानुसार शासनाकडून काही वर्षापूर्वी तलाठी कामगार व महसूल मंडळ अधिकारी यांच्यासाठी नवीन इमारत बांधून मिळाली.अनेक दिवस तत्कालीन अधिकाऱ्यांनी फक्त आपल नियमित काम व सेवेचा कालावधी पूर्ण केला. कार्यालयाच्या रंगरंगोटी व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार नाराजी व्यक्त केली होती. आधीच कार्यालय गावापासून दूर अन् त्यात व्यवस्था नाही. पण आता मात्र,आकर्षक कार्यालय पाहून कौतुक होत आहे.
सध्याचे कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी लोकसहभागातून व स्व:खर्चातून कार्यालयाचे सौंदर्य फुलवले. आकर्षक रंग, डिझाईन भिंत, नाव फलक, खिडक्यांचे सुदंर पडदे,अवतीभोवती सुंदर झाडे ठेवण्यात आल्याने मोठी शोभा वाढली आहे.
आता ब्राम्हणी कामगार तलाठी कार्यालयात आल्यानंतर आपण तालुका, जिल्हास्तरीय एखाद्या कार्यालयात असल्याचं वाटत.असे लोक म्हणतायेत
.देशाचा 78 वा. स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना मौजे ब्राम्हणी गावच्या शेतकरी ग्राहकांना कार्यालयात एट्री करतानाच आता समाधान आनंद वाटत आहे.कार्यालयाचा लुक चेंज झाल्याने ग्रामस्थांकडून कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांचे कौतुक होत आहे.
कार्यालय मोठ पण सुविधा नाही. आपण आपल घर जस व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो तस् घर स्वच्छ रहावे.असा प्रयत्न होता.त्यास गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी साद दिली.कार्यालय व्यवस्थित करण्यास यश आले.या कामाचे नक्कीच समाधान आहे.अशा प्रतिक्रिया तलाठी पाखरे यांनी दिली.