Home राहुरी वैभव शिंदे यांनी स्वीकारला पदभार

वैभव शिंदे यांनी स्वीकारला पदभार

60
0

राहुरी : पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून वैभव शिंदे यांनी बुधवारी दुपारी पदभार स्वीकारला.
नूतन बीडिओ सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आहे.यापूर्वी त्यांनी कोपरगाव,कर्जत येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम पाहिले.

राहुरी पंचायत समितीत गट विकास अधिकारी पदे जून पासून रिक्त होते. बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या नंतर श्रीरामपूरचे गटविकास अधिकारी सिनारे यांनी राहुरीचे अतिरिक्त काम पाहिले. अनेक दिवसानंतर राहुरीला गटविकास अधिकारी लाभले.

राहुरी तालुक्यात जिल्ह्याच्या तुलनेत आगळावेगळे काम करण्याचा प्रयत्न असेल. यामध्ये शिक्षण आरोग्य पाणी याला प्राधान्य देवू, कर्मचाऱ्यांशी चांगला समन्वय साधत अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न असेल. तालुका सुसंस्कृत जागृत व चांगला आहे. त्यामुळे निश्चित काम करताना सर्वांचा सहकार्य अपेक्षित आहे. अशी प्रतिक्रिया नूतन बीडिओ शिंदे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here