ब्राम्हणी : गावातील जेष्ठ,एक शिस्त प्रिय, अध्यात्मिक व्यक्तीमत्व गं.भा. दगडाबाई पंढरीनाथ अडसुरे यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार १६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता देवीचे तळे येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे. वन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बाजीराव अडसुरे व बाळासाहेब अडसुरे यांच्या त्या मातोश्री होत्या.तर,घेरूमाळ वस्तीच्या अंगणवाडी सेविका ताराबाई अडसुरे यांच्या त्या सासू होत्या.अमोल व निलेश अडसूरे यांच्या त्या आजी होत.