Home Blog परिसरात राहणाराच ठरला वैरी

परिसरात राहणाराच ठरला वैरी

142
0

गणराज्य न्यूज राहुरी – तालुक्यातील पूर्व भागातील मांजरी परिसरातील एका उसाच्या शेतामध्ये ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान राहुरी पोलीसांनी तपासाची वेगात चक्रे फिरवत काही तासात घटनेचा उलगडा केला असून एका आरोपीला अटक केली आहे.

शेतीच्या वादातून तसेच सोन्याच्या दागिण्यांसाठी दारूच्या नशेत या वृद्ध महिलेची हत्या झाल्याचे समजते. सुमन सावळेरराम विटनोर असे हत्या झालेल्या वृद्ध महिलिचे नाव असून संजय अशोक चोपडे (वय ३५) असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक समजलेली माहीती अशी की, मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या.माञ त्या उशीरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता काल सोमवारी दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. घटनेची माहिती समजताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथका समावेत घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रथमदर्शनी पाहणी करताच चानक्षपणे तपासाची सुञे फिरवली. चौकशी सुरू असतानाच काही तासात त्यांनी आरोपी निष्पन्न करून संशयतांना ताब्यात घेण्यास सुरू केलं मात्र याच्यातील मुख्य आरोपीला सुगावा लागताच त्याने घटनास्थळी वरून धुम ठोकली. राहुरी पोलीस पथकाने देखील तात्काळ त्याचा मोटरसायकल वरून पाठलाग केला मात्र त्याने पोलिसाला चकवा दिला. तरीही पोलीसांनी यंञना वापरत अखेर मांजरी परिसरातून मध्यराञी ताब्यात घेतले. उसाच्या शेतामध्ये पुरून ठेवलेले सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक कुलकर्णीपोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पथक ठसे तज्ञ आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, अमित राठोड, दीपक फुंदे, अशोक शिंदे, प्रवीण बागुल, नदिम शेख, सचिन ताजने, सचिन कुऱ्हाडे, संतोष दरेकर,प्रमोद जाधव आदि पोलिस पथकाने विषेश हि विषेश कामगिरी केली.

 

 

*संशयितांच्या बोलण्यात विसंगती,हालचालीवरून पोलीस पोचले आरोपींपर्यंत*
चोपडे यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आल्यानंतर पो.नि.संजय ठेंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळची पाहणी करून प्रथम दर्शनी संशयीतांच्या चौकशीतच पोलीसांचा संशय बळावला होता. चोकशी दरम्यान संशयितांची विसंगती तसेच एका ठिकाणच्या सी.सी.टि. व्हि. फुटेज च्या आधारावर आरोपी निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here