Home राहुरी आदर्शच भौतिक सुविधांच स्वप्न पूर्णत्वाकडे!

आदर्शच भौतिक सुविधांच स्वप्न पूर्णत्वाकडे!

150
0

गणराज्य न्यूज (गणेश हापसे,माजी विद्यार्थी)

राहुरी : तालुक्यातील श्री.शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळाच्या ब्राम्हणीच्या आदर्श माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा गुणवत्तेबरोबरच आता भौतिक सुविधेत जिल्ह्यात डंका!

 

सन 1966 सालात आदर्श माध्यमिक शाळा सुरू झाली.आता शाळेला 58 वर्ष पूर्ण होत आहे.आज अखेर (इ.5 वी ते इ.10 वी) तर,इयत्ता 11 व 12 वी वर्गातून असे सुमारे 17 ते 18 हजार विद्यार्थी बाहेर पडले.

कवायत

प्राप्त (भौतिक) परिस्थितीला सामोरे जात शाळेने गुणवत्ता टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्या माध्यमातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले. प्रशासकीय सेवा, उद्योग,व्यवसाय,शेती अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
गुणत्तेबरोबरच शाळेचा भौतिक विकास व्हावा! हे स्वप्न शाळेने अनेकदा पाहिल.ती शाळेची स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात दोन वर्षापासून भौतिक सुविधाकडे वाटचाल करत आहे.

वेळोवेळी पालक,ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक, विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक व वस्तुरूपात पुढे आल्याने आदर्श शाळेचा चेहरा बदलण्यास् वेग आला.

गत दोन-तीन वर्षात भरीव कामाची यामध्ये भर पडली.नव्याने 7 वर्ग झाले. नादुरुस्त वर्ग खोल्यांची दुरुस्ती झाली.आता सुमारे 28 वर्ग खोल्या शाळेकडे आहेत. विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था झाल्याने यापूर्वी अनेक वर्षापासून डबल शिपमध्ये भरणारी शाळा आता वर्षभरापासून एक शिप मध्ये भरत आहे. याची अनेक फायदे शाळा,विद्यार्थी,पालक यांना झाली.

शाळेची सुरक्षा महत्वाची असते.त्यासाठी एवढा मोठ्या एरिया असलेल्या शाळेच्या चारी बाजूंनी भक्कम कंपाऊंड करण्यात आल. त्याचा फायदा 58 वर्षात प्रथम इयत्ता दहावीचा परीक्षा बोर्ड (सेंटर) मंजूर झाल. आदर्शच्या नावाप्रमाणेच शांततेत परीक्षा पार पडली. याबाबत पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच कौतुक केल.

आता सीसीटीव्ही बसविण्याच काम सुरू आहे. त्याच काम अंतिम टप्प्यात आहे. सायकलीसाठी स्टॅन्ड,खिडक्या,दरवाजे,दुरुस्ती, खेळाचे मैदान सपाटीकरण, वृक्ष लागवड, संगणक लॅब, शिक्षक एक ड्रेस कोड, ओळखपत्र,पूर्ण शाळेला एकच रंग असे एक अनेक लहान मोठ्या गोष्टी शाळेने केल्या.यासाठी गावातील अनेकांनी माझी शाळा माझा अभिमान,मला शाळेने घडविले. पवित्र ज्ञानदानामुळे समाजात वावरतोय.याची जाणीव ठेवणाऱ्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी मोठ योगदान दिलं.यामध्ये पालक,पदाधिकारी,ग्रामस्थ, शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
आता मुली- मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज टॉयलेट, अर्धवट राहिलेले वर्गनिहाय फिटिंगच (फॅन,ट्यूब,कॉम्प्युटर पॉइंट), बसण्यासाठी बँच आदी काम बाकी आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या दिनी यंदा शाळेच्या वैभवात नव्याने भर पडावी. यासाठी पालक ग्रामस्थ विद्यार्थी या नात्याने आपण एक पाऊल पुढे यावे…आपल्या परीने आर्थिक सहकार्य करावे.

धन्यवाद………..!

(शाळेच्या प्रमुखांची प्रतिक्रिया) – आम्ही फक्त मात्र निमित्त….शाळेच्या योगदानात गावातील पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी ग्रामस्थ व शिक्षक आहेत.आम्ही हाक मारली.त्यावेळी सहकार्य मिळाले.प्रत्येक गावात गट असतात.पण ब्राम्हणी गाव शाळेच्या कामा बाबत अपवाद ठरलं.. गट-तट बाजूला ठेवून कायम विश्वास ठेवून काम करण्यासाठी मानसिक आर्थिक आधार दिला. मान सन्मानाची वाट न पाहता सहकार्य केलं. शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिस्तीसाठी गावकऱ्यांचा पुढाकार राहिला.शाळा एक शिफ्ट करण्याचे फायदे झाले.आता शाळेच्या वेळेत विद्यार्थी,शिक्षक बाहेर नाहीत.हे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून शक्य झालं. असा एक अनेक बाबी नमूद करता येतील…..
श्री.नानासाहेब जाधव (प्राचार्य – आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राम्हणी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here