अहिल्यानगर (गणराज्य न्यूज वेब टीम)- जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार (दि.१३) रोजी पार पडत आहे. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या ७५ आणि तालुका पातळीवर प्रत्येक पंचायत समितीनुसार १५० गणांच्या सदस्यांची आरक्षण सोडती कार्यक्रम तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निरिक्षक म्हणून काम पाहणार आहे.
यापूर्वी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांसाठी १९९१ पासून चक्रार पद्धतीने आरक्षण काढले जात होते. यापूर्वी कोणतेही आरक्षण असले तरी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने आयोगाच्या २० ऑगस्ट २०२५ मधील मार्गदर्शक सूचनानुसार नव्याने आरक्षण काढले जाणार आहे. यामुळे पूर्वीच्या आरक्षणाऐवजी आता त्यात्या तालुक्यात असणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीसह अन्य लोकसंख्या विचारात घेवून आजचे आरक्षण काढण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषद गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षणासह) व अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (महिलांसह) सोडत निघेल. पंचायत समिती गणाकरिता संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी असतील













