Home महाराष्ट्र राहुरी मार्केटच्या उपसभापतीपदी बाचकर

राहुरी मार्केटच्या उपसभापतीपदी बाचकर

35
0

गणराज्य न्यूज अहिल्यानगर : जिल्ह्यात आदर्शवत ठरलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी जांभळीगावचे मा.सरपंच रामदास बाचकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज गुरूवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनामधे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तनपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन,सभापती अरुण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.व्यासपीठावर मावळते उपसभापती बाळासाहेब खुळे, संचालक गोरक्षनाथ पवार, शामराव निमसे, सत्यजित कदम, रखमाजी जाधव, महेश पानसरे, सुभाष डुक्रे, मारूती हारदे, भाऊसाहेब खेवरे, प्रभाकर काळे, अॅड. भानुदास नवले, दत्तात्रय कवाने, मंगेश गाडे, सुरेश बाफना,चंद्रकांत पानसंबळ, मधुकर पवार दत्तात्रय शळके आदि होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here