Home महाराष्ट्र भाजपा पदाधिकाऱ्याचा राजीनामा

भाजपा पदाधिकाऱ्याचा राजीनामा

48
0

गणराज्य न्यूज
राहुरी फॅक्टरी
नगर-मनमाड रोडवरील सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे संतापलेल्या भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कुंडलिक कदम यांनी आपला पदाचा राजीनामा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

कदम यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून नगर-मनमाड रोडवरील दुरावस्थेमुळे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. मागील दहा दिवसांतच तब्बल सात ते आठ निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, या गंभीर प्रश्नावर कुठलाही जबाबदार लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नसल्याने आपण अत्यंत व्यथित झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ते पुढे म्हणतात की, सामाजिक कार्याला गती मिळावी या उद्देशाने तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, नागरिकांच्या मृत्यूकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने या किळसवाण्या राजकारणाची चीड निर्माण झाली आहे. याशिवाय नगर-मनमाड रोड दुरुस्ती कृती समितीमार्फत रस्त्याच्या प्रश्नावर प्रामाणिक लढा देणाऱ्या माझ्यासह सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ही बाब दुर्दैवी आहे.

या सर्व कारणांमुळे पक्षात काम करण्याची भावना उरली नसल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे श्री. कदम यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here