
गणराज्य न्यूज
विद्यार्थ्यांचे वाढते दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी राहुरी तालुक्यातील विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेने दप्तर मुक्त हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
शनिवार 13 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते 36 लॉकर बॉक्स असलेल्या दोन कपाटाचा शुभारंभ सोहळा व विठ्ठलवाडी व केंदळ बुद्रुक झेडपी शाळेतून बदलून गेलेले व नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला.
दप्तर लॉकर असलेली विठ्ठलवाडी झेडपी शाळा तालुक्यात पहिली ठरली आहे.जड दप्तरामुळे लहान मुलांच्या पाठीवर,खांद्यावर ताण, शारीरिक थकवा व शिकण्याची रुचीही कमी होते.यासाठी विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करणे ही काळाची गरज ओळखून सदर उपक्रम राबविण्यात आला. माजी मुख्याध्यापक राजू उदमले यांच्या संकल्पनेतील दप्तर मुक्त शाळा अनोख्या उपक्रमाच ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.दिलेला अभ्यासाठीची वह्या पुस्तके घरी नेण्यात येणार असून बाकी दप्तर आता लॉकरमध्ये राहणार आहे.
लॉकर उद्घाटन प्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाऊ शेटे,डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक प्रमोद तारडे ,गोरक्षनाथ तारडे,सरपंच गोविंद जाधव,उपसरपंच,अविनाश हरिश्चंद्रे,विजय चव्हाण,लक्ष्मण तारडे,मधुकर तारडे, पोलिस पाटील प्रल्हाद तारडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष तारडे, योगेश तारडे,उपाध्यक्षा प्रगती तारडे,मेजर रामदास तारडे योगेश औटी,बापुसाहेब बोरकर,गणेश बोरकर,प्रदीप भुसे,बाळासाहेब चव्हाण,जयराम डुकरे,मनोज तारडे ,अक्षय गाडे,संदीप कैतके,रामेश्वर तारडे बाबासाहेब कैतके, विरभद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शेळके सर,अण्णासाहेब देवरे, विठ्ठल तारडे,हरीभाऊ तारडे, मच्छिंद्र धसाळ, ज्ञानदेव मागुर्डे ,लक्ष्मण भुसे,ग्रामसेविका कावरे,कामगार तलाठी लोखंडे भाऊसाहेब, नवनाथ तारडे, मंगेश बोरकर, महेंद्र तारडे, आदी उपस्थित होते.यावेळी कु.आराध्या औटी,कु.समॄद्धी तारडे यांनी मनोगत व्यक्त करत बदलून गेलेल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजळा दिला.
विठ्ठलवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक राजू उदमले यांची बदली झाल्याबद्दल व
गोरक्षनाथ जेजूरकर नवीन आल्याबद्दल दोघांचा सन्मान करण्यात आला. तर, केंदळ बुद्रुक शाळेत केंदळ बुद्रुक येथील शाळेतून बदलून गेलेले रविकिरण साळवे,सुनिल शिंदे,संगिता खोमणे यांचा व नव्याने रुजू झाल्याबद्दल
पावडे मॅडम,देशमुख मॅडम,विठ्ठल वराळे आदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांसह,विद्यार्थी व ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले.
निरोप व स्वागत सन्मान सोहळ्याचे गणेश हापसे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.












