अहिल्यानगर : जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंदळ बुद्रुक येथील तारडे परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी तारडे परिवारातील महिलांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे औक्षण केले.
मराठा आरक्षण प्रश्नांबाबत आदर्शवत भुमिका घेवून अनेक वर्षापासूनचा प्रश्न व्यवस्थित संयमीपणे हाताळला. याबाबत जिल्ह्यातील मराठा बांधवांना आपला सार्थ अभिमान आहे. असे मत व्यक्त करत तारडे परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींनी नामदार विखे पाटील यांचा सन्मान केला.दरम्यान नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंदळ परिसरातील विकासाबाबत चर्चा केली. रस्त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी आदिनाथ तारडे, सुभाष तारडे, रामदास तारडे, मेजर बापूसाहेब तारडे, भाऊसाहेब भांड,अशोक दादा तारडे, सुरेंद्र तारडे व तारडे परिवार उपस्थित होता.













