ब्राम्हणी परिसरातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व मामा या नावाने ओळख असणारे स्व.रामदास बाळाजी शिंदे यांचा उद्या दशक्रिया त्यानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली….

सर्वसामान्य कुटुंबातील रामदास मामांनी आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत अडचणीच्या काळात प्रत्येकाला सहकार्य करण्याची भूमिका कायम राहिली.डॉ.तनपुरे सहकारी कारखान्यात स्लीप मास्तर या पदावर काम करत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी कायम मदत केली.याची आठवण आज अनेकांना कायम आहे. कोणतही काम प्रामाणिकपणे, पोटतिडकीने स्वतःला झोकून देत मामा करत होते.

आडनाव ,समाज, जात, धर्म या भिंतीच्या पलीकडे त्यांनी काम केलं. प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्यांनी आपल्या आयुष्यात सकारात्मक काम केलं. गुण्या गोविंदा एकत्र राहण त्यांना कायम आवडत … समाजात वावरण समाजासाठी काहीतरी करणं यासाठी त्यांची धडपड कायम राहिली.
अनेकांची लग्न त्यांनी जमविले. पण कधी मान पानाची अपेक्षा ठेवली नाही. याच गोष्टीमुळे ते परिसरात लोकप्रिय ठरले. अन् लहानग्यापासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाचे मामा बनले.तीच ओळख शेवटपर्यंत राहिली.
ब्राह्मणी ग्रामपंचायत सदस्य पद व ब्राह्मणी सहकारी सोसायटीचे संचालकपद त्यांनी भूषवले. अध्यात्मिक आवड जोपासत आध्यात्मिक कार्यात त्यांनी झोकून दिले. आदिशक्ती संत मुक्ताई पायी दिंडी सोहळ्यात त्यांनी बहुतांश आयुष्य त्यांनी वारकऱ्यांच्या सेवेत घालवलं.. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वास गणराज्य न्युज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…..
















