Home अहमदनगर विद्यार्थ्यांनी गिरविले ग्रामविकासाचे धडे

विद्यार्थ्यांनी गिरविले ग्रामविकासाचे धडे

209
0

शनिशिंगणापूर : लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी फिल्ड विजिट अंतर्गत शनिशिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.

ग्रामपंचायतचे कामकाज कसे चालते, कचरा नियोजन, सांडपाणी, आरोग्य व्यवस्था, सरपंच व ग्रामसेवकांचे कामकाज, ग्रामपंचायतीचा निधी, असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात होते, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिंगणापूर ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब बानकर व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख दिलीप डिके यांनी सविस्तरपणे माहिती दिली. ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच बाळासाहेब बानकर यांचा सत्कार लोटस इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने करण्यात आला.तसेच स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल बानकर यांनी सरपंच व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.आळंदीकर सर यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here