शिर्डी ; ब्राम्हणीतील स्वर्गीय विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलची सहल मंगळवार 24 डिसेंबर रोजी शिर्डी येथे जावून आली.
सकाळी 6 वाजता पालकांसमवेत विद्यार्थी शाळेत दाखल झाले. सहलीला जायचं म्हटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. स्कूलच्या प्राचार्य अश्विनी प्रकाश बानकर यांनी सहलीसाठी जाणाऱ्या सर्व बसच पूजन केलं.एलकेजीपासूनच् सर्व विद्यार्थी बसमध्ये बसले.अन् शिर्डीकडे बस निघाल्या.
शिर्डीतील एक अनोखे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आकर्षण साई हेरिटेज व्हिलेज या स्थळास विद्यार्थ्यांनी भेट दिली.श्री साई बाबांचे जीवन आणि काळ आणि प्रदेशातील पारंपारिक ग्रामीण जीवनशैली समजून घेतली. साई बाबांच्या जीवनातील दृश्ये पाहायला मिळाली. यामध्ये ग्रामीण भारतीय झोपड्या, बैलगाड्या आणि कृषी पद्धतींचा समावेश असलेले सेटअप देखील होते.दरम्यान हिरवाईने वेढलेले, प्रसन्न वातावरण अध्यात्मिक वातावरणाने आणखी भर घातली.
ग्रामीण वास्तुकला, कला आणि हस्तकलेचे प्रदर्शन पाहायला मिळाले.एकूणच विद्यार्थ्यांसाठी हे एक आदर्श ठिकाण ठरले..याशिवाय साई पालखी निवारा सोहळा वराष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे दर्शन घेतले. स्नेहभोजन केले. दिवसभर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.. सहली दरम्यान विलास बानकर स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.