शनिशिंगणापूर : श्रावण महिन्यात ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत शनि भक्तांना दरवर्षीप्रमाणे चौथर्यावर जाऊन पहाटे ५ ते ७ या वेळेत शनि महाराजांच्या मूर्तीवर जल अभिषेक करता येईल.
कर्नाटक राज्यातून आणलेल्या घडीव दगडांचा आकर्षक व सुशोभित चौथारा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.पूर्वी 18×18 फूट असलेला चौथरा आता 21×21 फूट करण्यात आला आहे.एकूण ६१ लाख रुपये खर्चाच शनिचौथरा नूतनीकरणाच काम आहे. कर्नाटक राज्यातून आणलेल्या घडीव दगडांच्या माध्यमातून आकर्षक चौथरा बनविण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या खर्चातून व शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून २६ जून २०२४ रोजी चौथरा सुशोभिकरण काम सुरु झाले.चौथ-याच्या चार बाजूस घडीव दगड बसविण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूच्या आकर्षक पाय-या व गोमुख आणि दगडी पात्र बसविण्यात आले आहे. दोन दिवसात शंभर टक्के काम पूर्ण होवून दर्शनासाठी खुला होणार असल्याचे देवस्थानची कार्यकारी अधिकारी जी.के दरंदले यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना सांगितले.