अहिल्यानगर : आकाशवाणी केंद्रावर आज संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वाटचालीवर आधारित आणि शासकीय योजनांच्या उपयोगिता या विषयावर स्वाती सचिन ठुबे यांची लाईव्ह मुलाखत प्रसारित होणार असून या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ.विक्रम कड, मंडल कृषी अधिकारी विनया बनसोडे या सहभागी होणार आहेत. आपणही या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता व तज्ज्ञांना फोन करून प्रश्न विचारू शकता, असे निवेदन आकाशवाणी अहिल्यानगर यांनी केले आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कार्यक्रम ऐकावा असे आवाहन ग्रीनअप परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

















