सोनई – पसायदान – आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या कार्यकर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल केलेल्या तीन भुमीपुत्रांचा पद्मश्री पोपटराव पवार व माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते पसायदान पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सोनई येथील आनंदवन पसायदानच्या परिसरात पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त पारायण सप्ताह समाप्ती च्या कार्यक्रमात सिद्ध समाधी योगच्या डॉ. हेमा वैरागर उद्योजक सुदाम तागड, काच कलेतील शिल्पकार राहुल लोहकरे यांना पसायदान पुरस्कार देण्यात आला.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी संस्थेने वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे, डॉ. तुषार दराडे,किशोर घावटे,अरुण घावटे व सदस्यांनी केला.साध्वी तुलसीदेवी, गोरक्षनाथ महाराज भोगे,अर्जुन महाराज काळे, रामनाथ महाराज तावरे,किशोर महाराज चव्हाण, विठ्ठल महाराज खाडे, अॅड सुनिल गडाख, शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर,शिवाजी बाफना, डॉ. शिरसाट आदी उपस्थित होते.
ह भ प रामेश्वर महाराज कंठाळे यांनी मनोगतात पसायदान म्हणजे विकास असल्याने विकासाचे दान म्हणजेच पसायदान आहे.या परिसरात असे एकमेव ठिकाण म्हणजे आनंदवन जिथे आनंद मिळतो असे सांगितले.माजी सभापती सुनीता ताई गडाख यांनी जे जे वंचितो ते ते लाभो याप्रमाणे जग सुखी व्हावे यासाठी आनंदवन संस्था कार्य करत असल्याचे सांगत जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख व प्रशांत पाटील गडाख यांची प्रेरणेतून होत असलेले कार्य भुषणावह असल्याचे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती राहुल लोहोकरे यांनी यांनी काच काम करताना अनेक पुरस्कार मिळाले असले तरी गावातून मिळालेली शाबासकी मनाला आत्मिक समाधान देणारी असल्याचे सांगत १४४ काच प्रतिमा आजपर्यंत तयार केले असल्याचे सांगत २० पुरस्कार मिळाले असून त्यात तीन जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.दुसरे पुरस्कारमूर्ती सुदाम तागड यांनी नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा आडत चालू केल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी रोख पेमेंट देण्याची सुरुवात घोडेगाव मार्केटने केली असल्याचे सांगत हा पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
तिसरे पुरस्कार मूर्ती डॉ. हेमा वैरागर यांनी वाचत न राहता आत्मसात करणे म्हणजे पारायण असल्याचे सांगत हा पुरस्कार बेंगलोर येथील गुरु ऋषी प्रभाकर, सर्व साधक,पती व आई-वडिलांना समर्पित असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी आनंदवनच्या सर्व स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करून लोकांचा सहभाग असल्यास विकास होत असल्याचे सांगत निसर्गाचं व्यवस्थापन करण्याचं आवाहन करून मुलांच्या हातात ती मोबाईल बाजूला करण्याचे आवाहन करत आनंदवन संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुढी सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले गणेश हापसे यांनी सुत्रसंचालन केले. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी पुढील वर्षभरात करणाऱ्या उपक्रमांची माहिती देत आभार मानले.