गणराज्य न्यूज ब्राम्हणी : आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ब्राह्मणीचा एच.एस.सी. (इयत्ता बारावी) बोर्ड परिक्षा 2023- 24 विज्ञान शाखेचा निकाल 100% व कला शाखेचा निकाल 95.34% लागला असल्याची माहिती प्राचार्य नानासाहेब जाधव यांनी दिली.
विशेष दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे.
विज्ञान शाखेत आदिती विठ्ठल कुऱ्हे (73.33 टक्के) हिचा प्रथम,श्रेयसी शिवाजी जाधव (72.67 टक्के) द्वितीय तर, किशोर बाबासाहेब काचोळे (72.00 टक्के) याने तृतीय क्रमांक पटकाविला.
कला शाखेत अश्विनी रमेश बानकर (80.50 टक्के) हिने प्रथम क्रमांक,राणी विजय सूर्यवंशी (74.17 टक्के) द्वितीय तर वर्षा मुरलीधर गायकवाड (73.00 टक्के) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत शाळेच्या नावाप्रमाणे आदर्श निकाल लागल्याबद्दल प्राचार्य एन.आर.जाधव सर, उपप्राचार्य गोरक्ष उगले सर, पर्यवेक्षक बाबासाहेब शिरसाठ सर,सर्व शिक्षक, ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.