गणराज्य न्यूज ब्राम्हणी : स्व.विलास बानकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बानकर व मधुबाला बानकर यांनी महिला पालकांच स्वागत करत त्यांना हळदी कुंकू लावून वान भेट देण्यात आला.
शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1 वाजे दरम्यान विद्यार्थी व पालकांना एकत्रित प्रत्यक्ष पेपर पाहण्यासाठी देण्यात आले.आपल्या मुलांचे नेमकी कुठं चुकतय? तर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला मुलगा – मुलगी अभ्यासात कुठ आहेत.हे तपासण्यासाठी स्व.बानकर स्कूल प्रत्येक परीक्षेनंतर पालकांना एक दिवस बोलावून त्यांचे पेपर पाहण्याचा दिवसभर कार्यक्रम घेत असतात.यामुळे आपला पाल्य ज्या विषयात मागे आहे.त्या विषयाच्या संबंधित शिक्षकाची प्रत्यक्ष भेटून समाधान पूर्वक चर्चा होते. सदर विषयाचे शिक्षक विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतात. प्राचार्य अश्विनी बानकर प्रत्येक विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यावर योग्य ती चर्चा करतात. एखाद्या विषयात मागे पडलेला विद्यार्थी पुढील वेळच्या परीक्षेत पुढं कस राहील.यासाठी प्लॅनिंग तयार केले जाते. त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची जबाबदारी पालक व संबंधित शिक्षकांवर निश्चित केली जाते. यातून संस्थेची गुणवत्ता वाढीसाठी मदत होते.पालक व शिक्षकांचा समन्वय साधला जातो. विद्यार्थ्यांचे आई-वडील सोबत येवून पेपर तपासत असल्याने आपल्या पाल्याच्या गुणवत्तेची माहिती त्यांना प्रत्यक्ष होते. हळदी कुंकू व पेपर तपासणी उपक्रमाच पालकांनी कौतुक केल.