राहुरी :
तालुक्यातील वरवंडी येथील वेदिका श्रीकांत ढगे या 3 तीन वर्षीय चिमुकलीवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला.शनिवार रात्री तो वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.
बिबट्याच्या हल्ल्यात गुरुवार (23 मे) रोजी सकाळी 8 च्या सुमारास जागीच वेदिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त करण्यात आली
गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वेदिका ही आपल्या राहत्या घरी अंगणामध्ये खेळत होती. याच वेळी घराजवळील शेतामध्ये गिन्नीगवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक 3 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. घरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने चिमुकलीला सोडून तेथून धूम ठोकली. मात्र यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे उचारासाठी हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिचा उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेदिकाला मृत घोषित केले.
——
96 गावांना 25 पिंजरे
राहुरी तालुक्यात एकूण 96 गावे आहेत. गावांना अवघे 25 पिंजरे उपलब्ध आहेत. सर्व पिंजरे फिल्डवर आहेत. पिंजऱ्यांची मागणी आल्यास मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. राहुरीला नवीन पिंजरे उपलब्ध व्हावेत यासाठी वरिष्ठांना माहिती कळविली असल्याची माहिती वनविभाग खात्याकडून देण्यात आली आहे.
—-
मुलगी घेतली होती दत्तक
मयत वेदिका ही अवघी सहा महिन्याची श्रीकांत ढगे यांनी दत्तक घेतली होती. मयत वेदिकाच्या पश्चात आजी, आजोबा, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
—–