गणराज्य न्यूज गणेश हापसे
अहिल्यानगर : महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन व प्रभाग कार्यालयातील पथकाने सोमवारी सकाळीच शहरातील झेंडीगेट परिसरात दाखल होत अनधिकृत पत्र्याचे शेड, टपऱ्यांसह दोन कत्तलखाने पाडून टाकले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
झेंडीगेट परिसरात सोमवारी सकाळीच पोलिस बंदोबस्तासह महापालिकेचे पथक दाखल झाल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले. यावेळी अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, टपऱ्या तसेच दोन अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महानगरपालिकेने दिलेल्या वेळापत्रकानुसार व नियोजनानुसार अतिक्रमण कारवाई सुरू राहणार आहे.