ब्राम्हणी : नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन अंतर्गत व नागरी सुविधा अंतर्गत ब्राह्मणी ते वने वस्ती (घेरुमाळ) वस्ती डांबरीकरण व मजबुतीकरण करणे (34 लाख रुपये) कामाचा भूमिपूजन सोहळा व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत (घेरूमाळ वने वस्ती) 11 लाख रुपयांच्या अंगणवाडी बांधकामाचे लोकार्पण मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होत असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष सुरेशराव बानकर, सरपंच सुवर्णा सुरेश बानकर यांनी दिली.