Home महाराष्ट्र ब्राम्हणी शाळेला नवीन मुख्याध्यापक

ब्राम्हणी शाळेला नवीन मुख्याध्यापक

2
0

राहुरी : तालुक्यात गुणवत्ता व भौतिक सुविधेच्याबाबतीत नावाप्रमाणे आदर्श ठरलेल्या ब्राम्हणी येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी श्रीनिवास पुंजाहरी खर्डे यांची नियुक्ती झाली…
श्री खर्डे एकूण 31 वर्ष शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवा केली..

24 जून 1996 पासून सेवेस प्रारंभ… सुरुवातीला अंबिका माध्यमिक विद्यालय मानोरी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले..त्यानंतर केशव गोविंद विद्यालय बेलापूर खुर्द येथे तीन वर्ष,संत तुकाराम विद्यालय बारागाव नांदूर या ठिकाणी सहा वर्ष आणि कै. मथुराबाई धुमाळ विद्यालय मुसळवाडी या ठिकाणी 19 वर्ष सेवा… आदर्श विद्यालय ब्राह्मणी शाळेत एक ऑगस्ट पासून उपमुख्याध्यापक पदी सेवेत रुजू होताच अल्पावधीतच त्याच शाळेत आता मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली…आज 5 ऑक्टोबर रोजी अधिकृत ऑर्डर प्राप्त झाली.
विविध शाळेत गणिताचे अध्यापन करताना गणित विषयाचा शंभर टक्के निकाल लावण्याची उत्तम कामगिरी केली. तत्कालीन मुख्याध्यापक श्री बोंबले सर सेवानिवृत्त झाले.. त्या जागी मुख्याध्यापक म्हणून आता खर्डे सर काम पाहणार आहे..

मुख्याध्यापकांची चांगली परंपरा
ब्राह्मणी परिसरात सर्वाधिक मोठी शाळा म्हणून आदर्श विद्यालयाचा नावलौकिक आहे.. ब्राह्मणीसह परिसरातील विविध गावातून विद्यार्थी शाळेत आहेत.. ब्राह्मणी ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक,विविध संस्था यांच्या योगदानातून शाळेचा समाधानकारक भौतिक विकास झाला.. आणखी महत्त्वपूर्ण सुविधा व गुणवत्ता टिकून ठेवणे एवढेच ग्रामस्थ व पालकांना आता नवीन मुख्याध्यापक खर्डे सर यांच्याकडून अपेक्षित आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here