ब्राम्हणी – सध्याच सरकार फक्त थापा मारणार सरकार आहे. फक्त पुढच्या योजनांच्या घोषणा करण्याचं काम सुरू आहे.पण मागच्या घोषणांचे काय? निवडणुका डोळ्यापुढे ठेवून फक्त घोषणा केल्या जात आहेत. माझ्या विरोधात कुणीही लढू द्या आपण आपल्या पाच वर्षाच्या कामाशी प्रामाणिक आहोत. हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे मी आत्मविश्वासाने सांगतो. असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे ब्राह्मणी ते पिंपरी वळण व ब्राह्मणी वांबोरी या रस्त्याच्या सुमारे चार कोटी छत्तीस लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ हापसे होते.
यावेळी पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की या कामासाठी आपण सण 2022 ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सुचवला होता त्यानंतर सरकार बदलले. पण पुढे गतिमान बनवणाऱ्या या सरकारने कामाच्या मंजुरीला आणि प्रत्यक्षात सुरुवातीला विलंब लावला यासाठी आरडगावात रस्ता रोको केला. व त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हायला 2024 उजाडला. अशाप्रकारे अनेक आपल्या सुचवलेल्या कामाला आणि मंजूर कामाला या सरकारने स्थगिती दिली. प्रसंगी कोर्टात जावे लागले.
पण जनतेच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण पाठपुरावा करत कुठेही न जाता पवार साहेबांबरोबरच आणि तालुक्याच्या जनतेचे बरोबर राहिलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रास्ताविकात भारत तारडे म्हणाले की उच्चशिक्षित. असल्याने व आमदारकीच्या माध्यमातून कामे कशी सोडविले जाते याची जाण असल्यामुळे 35 ते 40 वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ह्या रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. तर डॉक्टर राजेंद्र बानकर म्हणाले की पहिल्याच ट्रम चे आमदार होऊन मिळालेल्या मंत्रीपदाच्या संधीच्या माध्यमातून विकास कामे काय असतात हे दादांनी दाखवून दिले. तर मोकाटे गुरुजी म्हणाले की माजी आमदारांनी ब्राह्मणीला एक रुपयाही दिला नाही. मतासाठी ह्या फक्त घोषणा चालू असून ही सर्व नाटके असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषणात आ. तनपुरे यांनी अडीच वर्षाच्या पहिल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचा गोषवारा देतानाच पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधी बाकावरूनही कशा पद्धतीने कामाचा पाठपुरावा केला. हे करत असताना या सरकारने कशा पद्धतीने सुचवलेल्या कामाला विलंब करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे लक्षात आणून दिले . त्याचप्रमाणे आपल्यावर कशाप्रकारे दबाव टाकून पक्षात घेण्याचा प्रयत्न झाला. तरीही पवार साहेबांबरोबरच राहिलो. त्या एकनिष्ठ 12 आमदारांमध्ये मी आहे. याचा अभिमान आहे .परंतु त्यामुळे ईडीलाही सामोरे जावे लागले. सध्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहेत लाडक्या बहिणींना 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पण फक्त पाच हजार कोटी रुपये खर्च केले तर दाजींना रात्री अप रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही. दिवसा वीज देता येईल याचा विचार करणे गरजेचे होते. सध्या सर्वत्र बिबट्या आणि वाघांची संख्या वाढलेली असून शेतकऱ्यांना माता-भगिनींना रात्री अपरात्री काम करणे पाणी देणे यासाठी जावा लागते. जर दिवसा वीस दिली तर शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. बिबट्यांचा बंदोबस्त होण्या कामी पूर्वीच्या नियमात बदल करून कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून त्यात आपण प्राधान्याने शेतकऱ्यांना दिवसा विज देण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. ब्राह्मणी, वांबोरी ,पिंपरी वळण, चंडकापूर, केंदळ आधी परिसरातील लाभधारक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.