
राहुरी : सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ व पाठिंबा म्हणून आज शनिवारी दुपारी राहुरी तालुक्यातील वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुरी तहसीलवर मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देण्यात आल.
प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार आवटी यांनी निवेदन स्वीकारले.
आम्ही पूर्ण ताकतीनिशी रामगिरी महाराजांच्या पाठीशी आहोत. आमची श्रद्धा कायम आहे.
सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर प्रशासनाने निर्बंध आणावेत. अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. महाराजांविरुद्ध टीका करण्याचे थांबवा. अन्यथा वारकरी परिवार व सकल हिंदू समाज स्वस्त बसणार नाही. अशा तीव्र शब्दात ह भ प आदिनाथ महाराज दुशिंग यांनी मागणी केली.
आपण झोपलेलो आहोत. म्हणून खऱ्या अर्थाने ती अवलाद आपल्या विरोधात बोलत आहे. इथून पुढे प्रशासनाला आमची विनंती राहील की, तुमच्याने होत असेल तर सांगा नाहीतर आम्हा वारकऱ्यांना हातात दांडा घ्यावा लागेल. आता फक्त शांततेचे मोर्चे करून उपयोग नाही. हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. असे मत अर्जुन महाराज तनपुरे यांनी व्यक्त केले.
पोपट महाराज कुसमुडे म्हणाले की, आपण भारतातच राहतो का? आपल्यासमोर प्रश्न निर्माण निर्माण झाला आहे. प्रखर शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हभप रामगिरी महाराज यांनी तुमच्या आमच्या समोर वस्तुस्थिती मांडली यामध्ये काही चूक? वारकरी संप्रदाय खरं बोलणारा आहे.असे ह भ प राजेश्वरनंद महाराज म्हणाले….. सूत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले.













