ब्राम्हणी – वांबोरी रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप दैनंदिन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वाहतुकीसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या असंख्य खड्ड्याच्या खराब रस्त्यावरून अनेक दिवस प्रवास केला.आज उद्या रस्त्याचे काम होईल. अशी आशा प्रवाशांना कायम होती.इकडून तिकडून रस्त्याच काम मंजूर झाल.वर्क ऑर्डर निघाली. रस्त्याच्या कामाला लागणारे मटिरियल येवून साईटला पडले.पण अनेक दिवस होवूनही प्रत्यक्ष काम सुरू होण्यास मुहर्त सापडेना.परिणामी खडी रस्त्यावर आल्याने रस्ता असून अडचण अन् नसून खोळंबा अशीच परिस्थिती झाली.लोकांनी अनेक दिवस अडचणींना तोंड देत प्रवास केला. अखेर रस्त्याचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले.आता भविष्यात पुन्हा खराब रस्त्यावरून चालण्याची वेळ येणार नाही.असे उत्कृष्ट प्रकारे काम होईल.अशी अपेक्षा असताना सदर काम फक्त वेड वाकड उरकण्याची घाई होत असल्याचे दिसून येत आहे. सदर काम निकृष्ट दर्जाच होत असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सबंधित ठेकेदार,सुपरविजन करणाऱ्या बाधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालूनही कामात सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी एकदा,दोनदा काम बंद पाडले.पण ग्रामस्थांचा विरोध डावलून ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच काम उरकण्याच काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सदर काम असच उरकल.तर दोन चार महिन्यात पुन्हा रस्ता पूर्वीपेक्षा अधिक खड्याचा झाल्यास नवल वाटायला नको.ठेकेदाराचा निष्काळजीपणा,सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष पणामुळे कोट्यवधी रुपये असेच खर्च होणार हे निश्चित….त्यामुळे सदर रस्ता उत्कृष्ट दर्जाचा व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.