Home राहुरी मोटारसायकल चोरी दुसरी टोळी गजाआड

मोटारसायकल चोरी दुसरी टोळी गजाआड

97
0

राहुरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरी करणारी 7 आरोपींच्या दुसऱ्या टोळीपैकी 5 आरोपी गजाआड – 7 पैकी 3 आरोपी हे गॅरेज चालक 

अटकेतील पाच आरोपींकडून सहा दिवसाच्या पोलीस कस्टडी दरम्यान सात मोटरसायकल जप्त

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या मोटरसायकलच्या चोरींवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने तसेच चोरीस गेलेल्या मोटरसायकल शोधकामी डीबी पथक काम करत असताना मागील आठवड्यात पाच आरोपींकडून 11 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या होत्या. त्याच दरम्यान अजून एका मोटरसायकल चोरीच्या टोळी बद्दल माहिती मिळाल्याने तसेच राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्या काही मोटरसायकल चोरीमध्ये आरोपींची सीसीटीव्ही फुटेज मिळालेले असल्याने राहुरी पोलिसांनी मोटरसायकल चोरणारे एकूण 2 आरोपी विशाल प्रभाकर साठे व बबलू बाळासाहेब बर्डे रा.ब्राह्मणी,यांनी चोरलेल्या मोटरसायकलचे चेसिस नंबर, इंजिन नंबर वेगवेगळे स्पेअर खोलून वेगवेगळ्या गाड्यांना लावणारे 3 गॅरेज चालक रवी राघू सूर्यवंशी, कोहिनूर सोपान पवार, सोमनाथ सुरेश वैरागर ,सर्व रा.ब्राह्मणी अशा एकूण पाच आरोपींना अटक करून मा. न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड ची मागणी केली असता सरकारी वकील श्री रवींद्र गागरे यांनी सरकारतर्फे बाजू मांडून अटक आरोपी यांचा प्रथम तीन दिवस व नंतर 3 दिवस असा एकूण 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेतला असता पोलीस कस्टडी दरम्यान अटक आरोपीकडून एकूण सात मोटरसायकल ज्यांचे नंबर इंजिन नंबर , चेसिस नंबर वेगवेगळे असलेल्या जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक रखमाजी पिंपळे रा.मानोरी व कृष्णा संजय वैरागर रा.ब्राह्मणी यांचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो,अहमदनगर, मा.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, राहुल यादव , विकास साळवे, अशोक शिंदे, पोलीस नाईक प्रविण बागुल, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, नदीम शेख,सचिन ताजणे,पोको गोवर्धन कदम,जयदीप बडे, सतीश कुऱ्हाडे,अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना सचिन धनाड, पोना संतोष दरेकर यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते हे करत आहेत.

राहुरी पोलीस स्टेशन कडून सर्व गॅरेज चालक यांना आवाहन करण्यात येते की आपल्याकडे कुठलीही चोरीची गाडी चे इंजिन किंवा कुठले स्पेअर बदलून द्या अशी मागणी करत असेल तर आपण तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनची संपर्क करावा .सदर गाडीच्या मालकी हक्काबाबत खात्री करूनच गाडी दुरुस्तीचे काम करावे .कुठल्याही गाडीचे चेसिस नंबर वेगळे व इंजिन नंबर वेगळे अशा प्रकारे असेंबलींग करून देऊ नये .चोरीच्या गाडीचे चेसिस नंबर इंजिन नंबर गाडी पकडल्या जाऊ नये या उद्देशाने बदलून दिल्यास कारवाई करण्यात येईल. असे आवाहन संजय आर ठेंगे (पोलीस निरीक्षक)
पोलीस स्टेशन राहुरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here