नगर :
पोलीस नाईक संदीप चव्हाण तत्कालीन नेमणूक- स्थानीक गुन्हे शाखा,अहमदनगर सध्या नेमणूक दहशतवाद विरोधी पथक यास दीड लाख रूपयांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
तक्रारदार यांच्या हाॅटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 2 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.