ब्राह्मणीतील स्व.भैय्यासाहेब तारडे यांच्या एकाच कुटुंबात सहाव्यांदा डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी कारखान्याच्या संचालक पदाची संधी मिळाली आहे.
डॉ.तनपुरे कारखान्याच्या कालच्या निवडणुकीत जनसेवा मंडळाकडून श्रीमती वैशाली भारत तारडे यांच्या रूपाने सहाव्यांदा संचालक पद मिळाले.
सन 1989 पासून तनपुरे कारखान्याच्या राजकारणात भैय्यासाहेब तारडे होते. सुरुवातीच्या काळात फक्त एकदाच पराभूत झालेल्या भैय्यासाहेब तारडे यांनी नंतरच्या काळात आपल्याच कुटुंबाकडे संचालक पद ठेवण्यात यश मिळवले. आज भैय्यासाहेब व भारत भाऊ दोघे बाप लेक हयात नसताना तारडे कुटुंबियांनी संचालक पदाची परंपरा श्रीमती वैशाली यांच्यारूपाने कायम ठेवत. कारखान्याच्या राजकारणातील आपलं स्थान कायम ठेवलं.
सुरुवातीला भैय्यासाहेब केशव तारडे संचालक म्हणून निवडून आले. त्यांच्यानंतर पत्नी
गं.भा कुसम भैय्यासाहेब तारडे यांना संधी मिळाली. त्यांच्यापाठोपाठ
सौ.छायाताई अण्णासाहेब तारडे या निवडून आला. गत पंचवार्षिक निवडणुकीत स्व.भारत भैय्यासाहेब तारडे
संचालक होते. त्यांच्या निधनानंतर जनसेवा मंडळाकडून
श्रीमती वैशाली भारत तारडे यांना उमेदवारी मिळाली.
अनेक वर्ष स्व.माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या परिवारासोबत भैय्यासाहेब तारडे यांनी राजकारणास प्रारंभ केला. 3 वर्षापूर्वीच्या काळात स्व.भारत तारडे तनपुरे यांच्यासोबत गेले.तनपुरे परिवाराशी एकनिष्ठ राहिलेल्या भारत तारडे यांच्या कुटुंबाला तनपुरे यांनी कायम आधार दिला. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिली.अन् श्रीमती वैशाली भारत तारडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या.
राहुरी तालुक्यात तारडे परिवाराचा गोतवळा मोठा आहे. याचा फायदा नक्कीच त्यांना कायम कारखान्याच्या निवडणुकीत झाला. स्व.भारत तारडे यांच्या निधनानंतर या परिवाराची राजकीय वाटचाल काय? असा प्रश्न अनेकांना होता. स्व. भैय्यासाहेब व भारत भाऊंचा राजकीय वारसा आता पुन्हा सुरू होतोय. ब्राह्मणी गावात तारडे परिवाराच राजकीय स्थान कायम टिकून राहील.सध्या ग्रामपंचायतमध्ये स्व. भैय्यासाहेब तारडे यांचे पुतणे गणेश दिलीप तारडे सदस्य म्हणून आहेत.लवकरच त्यांच्या कुटुंबाला भविष्यात उपसरपंच पदाची संधी मिळणार हे निश्चित आहे.
















