मुंबई – राज्यातील लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्तावेळेच्या आधीच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थीची संख्या घटण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
















