टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करत ब्राम्हणीतून संत सावता महाराज पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवारी दुपारी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने ब्राम्हणीनगरी काही काळ विठ्ठलमय झाली. गत अनेक दिवसापासून आषाढी वारीची वारकऱ्यांना उत्सुकता होती.
आदिशक्तीच्या दरबारातून पालखी निघाली. गावातील श्री राम मंदिर परिसरात ग्रामस्थांनी मोठा उत्साह दिंडीचे स्वागत केले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. दिंडी मार्गावरील ग्रामस्थांनी सडा रांगोळी करत दिंडीचे स्वागत केले. बस स्टॅन्ड पर्यंत वारकऱ्यांना वाट लावण्यासाठी कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आण्णासाहेब हापसे यांच्या परिवाराने पालखीचे स्वागत केले.पुढे खुळे परिवाराने चहा पाणी दिले. ससे गांधले वस्ती येथे मोहन ढोकणे यांच्यावस्तीवर पालखीतील वारकऱ्यांना जेवण दिले.आजचा मुक्काम वांबोरीत असणार आहे.